सणबूर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान आरोग्य शिबीर संपन्न.

 


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सणबूर (ता.पाटण ) ग्रामपंचायत व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ( पाटण) संयुक्त विद्यमाने सणबूर येथे आयोजित सर्व रोग निदान आरोग्य शिबिरात135जणांची आरोग्य तपासणी,करण्यात आली त्यात 2 जण डेंग्यू सद्दश्य आजाराचे संशयित सापडले तर शिबिर स्थळी 60 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.

         सणबुर व परिसरात डेंग्युच्या आजाराचे रूग्ण सापडत आहेत,तर सळवे प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सणबूरला सापत्न वागणुक मिळत असल्याचा आरोप सणबूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच व ग्रामस्थांनी यापूर्वी केला होता या पार्श्वभूमीवर सणबूर ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाच्या सहकार्याने सणबूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले आले होते.

           शिबिरात 98 जणांची सर्वरोग निदान तपासणी करण्यात आली त्यात 2 जणांमध्ये डेंग्यू सद्दश आजाराची कांही लक्षणे आढळून आली ते संशयास्पद वाटले याद्दष्टीने त्यांची फेर तपासणी व उपचार केले जाणार आहेत. यावेळी कोरोना बाधित वा संशयास्पद एकही. रुग्ण आढळून आला नाही तर यावेळी 60 लोकांना कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस देण्यात आली.यापूर्वी दोनवेळा ग्रामपंचायती मार्फत जंतुनाशक फवारणी करण्यात आली होती.    शिबिरासाठी सळवे प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बने,डॉ.पुनम शिंदे,डॉ. आर.बी. घोळवे,डॉ.ए.एस.माने,आरोग्य पर्यवेक्षक एस. बी.सूर्यवंशी,आरोग्य सेवक एस.पी.वाबळे,एस. आर.सुतार,आरोग्य सेविका प्रभावती गावित, लँब टेक्निशियन विजय पाटील,आशा सेविका संजना देसाई ,सुनिता जाधव , तसेच सणबूरचे उपसरपंच संदीप जाधव,सरपंच, ग्रामसेवक अनिल चव्हाण, शिवाय नवतरुण गणेश मंडळ वरचे आवाड, नवतरूण गणेश मंडळ गांधी चौक / पुजारीआळी, जोतिर्लिंग गणेश मंडळ मेनरोड, चव्हाणवाडी, देसाई वाडी/गुलाबनगर जनसेवा मंडळ विकासलेन आदी मंडळाचे कार्यकर्ते व सदस्यांनी यांनी परिश्रम घेतले.