नवभारत पतसंस्थेच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान.

कोरोना महामारी रोखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्यांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य : सारंग पाटील 







कुंभारगाव विभागातील कोरोना योध्यांचा सन्मान करताना सारंग बाबा पाटील, समवेत संजय देसाई, स.पो.नि संतोष पवार व इतर मान्यवर.
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तळमावले ता. पाटण येथील नवभारत ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्थेच्या वतीने अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील व स्थानिक कोरोना समिती यांचा कोरोना योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्य प्रमुख सारंगबाबा पाटील उपस्थित होते. 

या वेळी उपस्थितांना मार्गदरशन करताना सारंग पाटील म्हणाले कोरोना महामारी देशासाठी अत्यंत वेदनादायक आहे गेल्या दोन वर्षापासून आपण या कोविडच्या संकटाशी दोन हात करत जगत आहोत. कोरोनाच्या महामरीत अत्यंत प्रमाणिकपणे आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून आपले आद्य कर्तव्यपार पाडणाऱ्या सर्व घटकांनी आपले काम रात्रंदिवस केलेले आहे यांचा सार्थ अभिमान म्हणून या सर्वांचा मानसन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

या विभागाचे माजी जि.प.सदस्य व शिक्षण सभापती व कुंभारगावचे सुपूत्र संजय देसाई यांनी स्थापन केलेली नवभारत पतसंस्था या विभागाची खरी अर्थवाहिनी बनली आहे. तसेच संजिवन प्रतिष्ठान चे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद आहे इथुन पुढील काळात देखील आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य होत राहु ही सदिच्छा सारंग व्यक्त केली.

यावेळी तळमावले व काळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व त्यांची टिम, ढेबेवाडीचे सपोनि संतोष पवार, हेड कॉन्स्टेबल नवनाथ कुंभार, डॉ. सुभाष ताईगडे, डॉ.रवींद्र यादव, डॉ.अजय सपकाळ, डॉ.घारे, डॉ.मनोज शिद्रुक, डॉ.राहुल पाटील, तळमावले सरपंच सौ.शोभाताई भुलूगडे, भागातील डॉक्टर, नर्स, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य इत्यादींचा कोविड योध्दा म्हणून सारंगबाबा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.