माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ईडीने जारी केली लुकआऊट नोटीस

 


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे १०० कोटी वसुली आरोपपत्र प्रकरणात आणखी अडचणीत वाढ झाली आहे. देशमुख हे देश सोडून जाऊ नयेत यासाठी ईडीने त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. ईडीने जारी केलेल्या लुकआऊट नोटीसमुळे आता अनिल देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना १०० कोटी रुपये वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्याआधारे सीबीआयकडून सुरु असलेल्या तपासान्वये ईडीनेही पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास सुरु केला आहे. या चौकशीसाठी ईडीने तब्बल पा वेळा अनिल देशमुख यांना समन्स पाठवले होते. मात्र पाचही समन्सला देशमुख हजर राहिले नाहीत. तर देशमुखांच्या शोधासाठी ईडीने आतापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी घातल्या आहेत. संपुर्ण राज्यात ईडीची पथके एकाच वेळी देशमुखांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. त्यामुळे अनिल देशमुख देश सोडून जाऊ नये यासाठी ईडीने त्यांना लुकआऊत नोटीस बजावली आहे. या लुकआऊट नोटीसीनुसार अनिल देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार ईडीला मिळाले आहेत. देशमुख हे देश सोडून जाऊ नयेत यासाठी देशभरातील विमानतळांनाही नोटीस गेली आहे. त्यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विमानतळावरच थांबवण्यात येईल.