राजे संघर्ष प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम...

विभागातील बालकांची आरोग्य तपासणी, पौष्टिक आहार व औषधे वाटप.



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आपल्या जीवनात चांगल्या आरोग्यासाठी चांगले पोषण घेणे खूप महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या विषयाचे महत्त्व ओळखून दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर सप्टेंबर महिना हा “जागतिक पोषण दिन” साजरा केला जातो.
  
याचेच औचीत साधत नेहमीच सामजिक कार्यात अग्रेसर असणारे राजे संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेशजी पाटणकर यांचे विदयमाने राष्ट्रीय पोषण महाअभियान अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पाटण यांचे मार्गदर्शनाखाली तळमावले - काळगाव विभागातील कमी वजनाच्या बालकांची आरोग्य तपासणी, औषधे व पौष्ठिक पूरक खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.



शनिवारी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रात हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी कुंभारगाव सरपंच सौ. सारिका पाटणकर यांनी उपस्थितांना पौष्टिक पोषण आहारा बाबत माहिती दिली. तसेच या कार्यक्रमात सौ.कुसुम दीक्षित (पर्यवेक्षिका) तळमावले बीट व सौ.अरूंधती गरुड (पर्यवेक्षिका) काळगाव बीट यांनी रांगोळीतून कुपोषण मुक्तीचा अनोखा संदेश दिला .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सारंग पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते म्हणाले देशाला निरोगी, बलवान ठेवण्यासाठी बाळाच्या जन्मापासून किमान 6 वर्ष सकस आहार कसा व किती मिळाला पाहिजे या बाबत साविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विभागातील बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे व पौष्टिक पूरक आहाराचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमासाठी युवा नेते सारंग बाबा पाटील, युवा नेते सत्यजित पाटणकर, समाजसेवक योगेश पाटणकर, पाटण पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव देसाई, राष्ट्रवादी पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे , माजी पंचायत समिती उपसभापती रमेश मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी पाटण विजय विभुते, कुंभारगाव सरपंच सौ सारिका पाटणकर, जन सहकार निधीचे चेअरमन मारुती मोळावडे, संगीता पुजारी, सचिन सावंत, सरपंच अनिल डाकवे, सरपंच रमेश नावडकर, डॉ उमेश गोंजारी व राजे संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.


हा उपक्रम राबवल्या बाबत राजे संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेशजी पाटणकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या कार्यकर्माचे सूत्रसंचलन राजेंद्र कदम यांनी केले तर आभार कुंभारगाव सरपंच सौ सारिका पाटणकर यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजे संघर्ष प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.