जनसहकार निधी संस्थेस सारंग पाटील यांची सदिच्छा भेट.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तळमावले ता पाटण येथील जन सहकार निधी संस्थेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील (बाबा) यांनी सदिच्छा भेट दिली ते तळमावले व काळगाव विभागातील विकास कामांच्या दौऱ्यासाठी आले होते. यावेळी सातारा जिल्हा नियोजन सदस्य राजाभाऊ काळे, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटणकर उपस्थित होते. जनसहकार निधी संस्थेने अल्पावधीत गरुडझेप घेतली आहे आणि अल्पावधीत संस्थेची विश्वासार्हता वाढली आहे व संस्थेचा नेहमी सामाजिक कार्यात सहभाग असतो याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मारुती मोळावडे यांचे सारंग पाटील यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागातील सरपंच उपस्थितीत होते त्यांनी त्यांच्या गावातील विकासकामांचे निवेदन सारंग पाटील यांना दिले.
सारंग पाटील आणि उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष मारुती मोळावडे आणि संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार समितीचे सर्व सदस्य, सेवकवर्ग, तळमावलेतील व्यापारी, विभागातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज