काळगांव परिसरातील पुरग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू : सारंग पाटील



काळगांव परिसराला भेट देऊन पुरग्रस्तांशी सारंगबाबा पाटील यांनी संवाद साधला.त्यावेळी पुरग्रस्तांच्या मागण्याचे निवेदन सारंग पाटील यांना देतांना माजी सरपंच हैबतराव काळे, राजु काळे व पुरग्रस्त. 

ढेबेवाडी |  कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
काळगांव तालुका पाटण व परिसरातील पूरग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे राज्याध्यक्ष सारंग पाटील यांनी काळगांव पुरग्रस्तांना दिले.

       काळगांव व परिसरातील जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात बाधीत कुटुंबियांची व्यथा जाणून घेण्यासाठी व गणेश मंडळांना भेट देणेसाठी सातारा लोकसभा संघाचे खासदार श्री श्रीनिवास पाटील साहेब यांच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस आय टी सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष सारंग पाटील , केंद्रीय नियोजन "दिशा समिती" व जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य राजाभाऊ काळे यांनी काळगांव व परिसराला भेट देवून पाहणी केली व पुरग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत पुरग्रस्त कुटुंबियांची विचारपूस केली त्यावेळी ते बोलत होते.



              सारंगबाबा यांनी पुरग्रस्तांच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले व सर्व अडचणी सोडवणेसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांचे कडून पाठपुरावा करणेचे आश्वासन दिले. या वेळी सूर्यकांत उर्फ राजू काळे यांनी पुरग्रस्तांच्या नुकसानीचे योग्य पंचनामे न करणे त्यांच्या अडचणीच्या काळात मदत न करता त्यकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे यासाठी कारणीभूत असलेली काळगाव ग्रामपंचायत, ग्रामसेवक,तलाठी,सर्कल यांनी राजकीय दबावामुळे पुरग्रस्तांना कसे दुर्लक्षित केले याची माहिती दिली.

          माजी सरपंच आनंदराव काळे यांनी सर्वांचे स्वागत केले,. पोलिस पाटील नितिन काळे यांनी आभार मानले. यावेळी गणेश मंडळाचे कार्यकर्ते, सेवा सोसायटीचे माजी सचिव विलास पाटील, ग्राम पंचायतीचे माजी सदस्य सुनिल तेटमेे , सतीश पाटील बापूसाहेब दुधडे, सुभाष पाटील,संजय पाटील,आदी उपस्थित होते.