प्रभाग क्रमांक २१० मधील समस्यांसाठी नगरसेविका जामसुतकर यांची पायी फेरी


माझगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
भायखळा येथील प्रभाग क्रमांक २१० मधील रहिवाश्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेविका सोनम जामसुतकर व शिवसेना माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी या भागात नुकतीच पायी फेरी काढली. त्यांनी प्रभाग क्रमांक २१० मधील मुलजी मानाजी रोड येथील सुमेर टॉवर व बरकली अपार्टमेंट येथील रहिवाश्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता ई वॉर्डचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू, दुय्यम अभियंता संगीता उशिरकर,कनिष्ठ अभियंता तुषार पाटील यांच्यासोबत या विभागाची पाहणी केली.

पाहणी करत असताना रहिवाश्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सुचनाही यावेळी नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सुमेर टॉवर व बरकली अपार्टमेंट चे सर्व कमेटी मेम्बर्स व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज