मुंबई जनता दलातर्फे गेल ऑमव्हेट आणि जयंत पवार स्मृती जागर संपन्न


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
जनता दल ( सेक्युलर ) पक्षाच्या वतीने मानवमुक्तिच्या लढ्यातील शिलेदार दिवंगत डॉ.गेल ऑमव्हेट आणि पत्रकार, साहित्यिक जयंत पवार या दोघांच्या स्मृति जागवणारी जागर सभा भिमछाया सांस्कृतिक केंद्र, सांताक्रुझ (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली होती.पक्षाचे मुंबई सचिव संदेश गायकवाड यांच्या पुढाकाराने ही सभा घेण्यात आली.

जागर सभेची सुरुवात शाहिर शशांक कांबळे, शांतनु, कॉम्रेड सुनील कदम, शाहिर अरुण कांबळे आणि शाहिर अश्विन कांबळे यांनी परिवर्तनाची गीते गाऊन केली.कॉम्रेड सुबोध मोरे, प्राध्यापक रमेश कांबळे, जनता दल सेक्युलर, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर जनता दल सेक्युलर,मुंबई महासचिव ज्योती बडेकर यांनी शोषणविरहीत समाज-व्यवस्था प्रस्थापित करण्याकरीता सांस्कृतिक संघर्ष अपरिहार्य असुन जो कुणी कष्टक-यांच्या,सर्वहारांच्या न्याय हक्कांसाठी लढतो त्यांच्या सोबत आपण सर्वशक्तिनीशी उतरलं पाहिजे म्हणत डॉ गेल ऑमव्हेट आणि जयंत पवार यांच्या कृती, संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला.

अभिनेत्री संध्या पानस्कर यांनी जयंत पवार यांच्यावरील लेख वाचून त्यांची व्यक्तिरेखा जिवंत केल्या. आरती मिलींद पवार या तरूणीने डॉ.गेल लिखित लेखाचं वाचन केले. जनता दल सेक्युलर, तालुका अध्यक्ष नितेश शिंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, अभिषेक गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले. सभेला कॉम्रेड शैलेन्द्र कांबळे, प्रकाश मोरे, पत्रकार दिपक पवार, प्राध्यापक अभिनया कांबळे, सुंदर पाडमुख, जयप्रकाश डागौरी, योजना लोखंडे, संतोष गायकवाड, विनोद खैरे, गील रॉय आदि मान्यवर उपस्थित होते.