मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगरशेती सहकारी क्रेडिट संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.

संस्थेचे चेअरमन अनिल शिंदे वार्षिक सभेच्या शुभारंभ प्रसंगी दिप प्रज्वलन करताना समवेत इतर मान्यवर.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तळमावले.ता.पाटण येथील दि.मर्चंट सिंडिकेट ग्रामीण बिगरशेती सहकारी क्रेडिट संस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 28.09.2021 रोजी सकाळी संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. 

प्रारंभी देशातील हुतात्मे, राजकीय नेते, पूरग्रस्तांना तसेच कोविडमुळे मृत नागरिक, सभासद व ठेवीदारांना आदरांजली वाहण्यात आली.

विषयपत्रिकेवरील 10 विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सर्व ठराव बहुमताने पारित करण्यात आले. संस्थेला या आर्थिक वर्षात 8 लाख 22 हजार 927 रुपये नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन अनिल शिंदे यांनी दिली.

सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अनिल निवृत्ती शिंदे हे होते. यावेळी व्हा.चेअरमन राजेश शंकर करपे,संचालक ज्ञानदेव श्रीपती जाधव,शिवाजी भाऊसो देसाई,लक्ष्मण मारुती मत्रे,महेश हरिभाऊ कोकाटे,सल्लागार सुरेश देसाई,कायदेशीर सल्लागार अँड.अधिक चाळके ,शिवसेना पाटण तालुका उपाध्यक्ष सागर नलावडे, उपसरपंच अधीकराव माने,रामचंद्र पाचूपते आदी उपस्थित होते.

संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करताना व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर.

चेअरमन अनिल शिंदे यांनी सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक केले .संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर यांनी केले.व्हा.चेअरमन राजेश शंकर करपे यांनी आभार मानले.यावेळी संस्थेचे उपव्यवस्थापक शरद शिंदे,ओंकार शिंदे, सविता सपकाळ,सर्व सेवक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.