डोंगरापासून सीमेपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी - प्रा.दादाराम साळुंखे


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
सुभेदार जगन्नाथ शिद्रुक फौजींचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुस्तकाने मुलांवर योग्य संस्कार होतील असे मत प्रा. दादाराम साळुंखे यांनी व्यक्त केले. ते जगन्नाथ शिद्रुक फौजी यांच्या जीवनावरील ‘डोंगरापासून सीमेपर्यंत’ या पुस्तक प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुभेदार पांडूरंग उदूगडे, प्रा. ए.बी.कणसे व सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पवार, आनंदराव पाचुपते, महादेव पानवळ, लेखक शिवाजी मस्कर, रघुनाथ मानुस्करे, फौजी विश्णू चव्हाण, स्पंदन प्रकाशनचे डाॅ.संदीप डाकवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रा.दादाराम साळुंखे पुढे बोलताना म्हणाले, ‘डोंगरापासुन सीमेपर्यंत’ हा प्रवास अतिशय खडतर आहे. जगन्नाथ फौजी यांचा लहानपासून आतापर्यंतचा प्रवास लेखक शिवाजी मस्कर यांनी खुप छान रेखाटला आहे. अनेक समस्या, अनुभवांना तोंड दिल्यानंतर लेखक घडतो. आपल्याला नात्यांची जाण असली पाहिजे. टीव्हीतील नाती आपणांस गोड वाटताहेत. परंतू घरातील नाती खरी आहेत.
या प्रसंगी मेजर सुभेदार पांडूरंग उदुगडे यांनीही सुभेदार जगन्नाथ शिद्रुक यांच्याबरोबर केलेल्या सेवा कार्याचा गौरव केला व शुभेच्छा दिल्या. फौजी यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाची गरज समाजाला आहे. फौजी यांचा जीवनपट नवीन मुलांना प्रेरणादायी आहे.  असे मत प्रा.ए.बी.कणसे सर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, पुस्तकाचे लेखक शिवाजी मस्कर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये पुस्तकामागली प्रेरणा, निर्मिती इ. बद्दलचे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले. आभार प्रदर्शन विजयराव पाचुपते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभिजित शिद्रुक, आबा शिद्रुक, शामल शिद्रुक, छाया शिद्रुक, शिद्रुक परिवार, नातेवाईक व मित्रमंडळी यांनी विषेश परिश्रम घेतले.