महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी महिला बचत गटांना सिताई महिला बचत गट व सिताई फाउंडेशन च्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार : कविता कचरे

सिताई फाउंडेशन च्या वतीने मुटलवाडी येथील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना मदत.

सिताई फाउंडेशनच्या वतीने मुटलवाडी (काळगांव) येथील अतिवृष्टीग्रस्त कुटुंबियांना मदत करताना सिताई फाउंडेशनच्या कविता कचरे व सहकारी महिला.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
महिला सुशिक्षित असो वा अशिक्षित संसाराचा गाडा चालवण्याचा मोठा वाटा महिलांचाच असतो यासाठी महिला सक्षमतेसाठी बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेतच पण महिला स्वावलंबी व्हाव्यात यासाठी महिला बचत गटांना सिताई महिला बचत गट व सिताई फौंडेशनच्या माध्यमातून व्यवसाईक प्रशिक्षणासह सर्वतोपरी मदत व सहकार्य केले जाईलअशी ग्वाही सिताई फौंडेशन च्या अध्यक्षा कविता कचरे यांनी दिली.

       मुट्टलवाडी काळगाव येथे जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने घरात पाणी गेल्याने तसेच जमिन उफाळून घरात उमाळे फुटून संसारोपयोगी साहित्य व धान्याची नासाडी झालेल्या कुटूंबियांना तळमावले ता.पाटण येथील सिताई फौंडेशनच्या वतीने साड्या,राजगिरा लाडू,अशा जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

         या वेळी मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरिक्षक विक्रांत कुंभार व सिताई महिला बचत गटातील सर्व सहकारी, राजु जाधव , संभाजी जाधव, किरण ओव्हाळ सणबुर, यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी राजू मुटल व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.