श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दोन दिवसाचे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन.

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दोन दिवसाचे ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.दि. 3 व 4 सप्टेंबर 2021 रोजी. हे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे. बी फार्मसी व एम फार्मसी च्या अभ्यासक्रमामध्ये शोधनिबंध समाविष्ट केला आहे. त्याच्या अनुषंगाने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांना सराव शाळा आणि प्रकल्प कामासाठी तयार करणे फार्मसी कोर्स रेगुलेशन 2014 च्या अभ्यासक्रमांमध्ये प्रॅक्टिस स्कूल आणि प्रोजेक्ट वर्क हे साधन म्हणून समाविष्ट आहे.विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवकल्पना ची ओळख करून देणे "सराव शाळा"आणि "प्रोजेक्ट वर्क" संबंधित विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अडचणी व त्यांच्या शंकांचे निरसन करणे हा यामागील प्रमुख हेतू ठेवून तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन या कामी होणार आहे.

या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते डॉ.एस बी भिसे (आरोग्य लाभ फाउंडेशन पुणे ) प्रा अनंत एन नाईक (संचालक अॅमिटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ग्वाल्हेर ) डॉ.एस वासुदेव मूर्ती (प्राचार्य श्री जयमुखी कॉलेज ऑफ फार्मसी नरसमपेठ वारंगल) प्रा. रविंद्र जी कुलकर्णी (भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज पुणे) डॉ.ए. श्रीनाथ (राष्ट्रीय कॉलेज ऑफ फार्मसी शिवमोगा) डॉ.के.ए. कमलापुरकर (डी एस टी एस कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ.उषा जोहरी, सचिव श्री प्रसून जोहरी यांनी या राष्ट्रीय चर्चासत्रास शुभेच्छा दिल्या आहेत.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयानंद आरलेलीमठ, संयोजक श्री एम एन उराडे, डॉ.ए.व्ही. बेलवोटागी व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी केली आहे.