माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त मंद्रुळकोळे येथे विविध मान्यवरांचे अभिवादन.

 मंद्रुळकोळे : कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांना जयंती प्रसंगी अभिवादन करताना मान्यवर.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 88 व्या जयंती निमित्त मंद्रुळकोळे (ता.पाटण) या त्यांच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.

     यावेळी आण्णासाहेब काळे ,संजय पाटील, विलासराव धनवडे, श्रीकांत पाटील, अशोक पाटील, पवन पाटील, आप्पासो पाटील, संग्राम पाटील, सागर पाटील, शिवाजी पाटील, सुभाष पाटील, नितीन चव्हाण, पोपट पावने, अनिल कदम, प्रताप मुळीक, लक्ष्मण भिंगारदेवे, मेघाली शिंदे, नंदा स्वामी, सिमा पांढरपट्टे, सविता शिंदे, वंदना मुळीक, शुभदा पाटील, संगीता पाटील, मंगल शिंदे, सुनिता पुजारी, आशा जानुगडे आदींसह ग्रामस्थांनी अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याचे दर्शन घेवून आभिवादन केले.

         कष्टकरी माथाडी कामगार आणि मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी आपले उभे आयुष्य वेचणा-या अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना संघटीत करून माथाडी कायद्याव्दारे कष्टक-यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणले. आयुष्यभर कष्टकरी कामगारांच्या हितासाठी संघर्ष करून त्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करून दिले. स्व.अण्णासाहेब पाटील यांचे जीवन चरित्र म्हणजे कष्टकरी कामगारांना स्फुर्ती देणारा इतिहास आहे. आण्णसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देवून त्यांच्या विचारानुसार वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.