कुंभारगाव येथील युवक अच्युत भंडारे याचे दुःखद निधन.

 

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव ता पाटण येथील पोपट बयाजी भंडारे यांचे धाकटे चि.अच्युत भंडारे यांचे वयाच्या 28 व्या वर्षी काल गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अच्युत भंडारे स्वभावाने मितभाषी होता. श्री स्वामी समर्थांचा भक्त होता त्याची विठ्ठल रखुमाई देवावर अतूट श्रद्धा होती. त्याने असंख्य मित्र जोडले होते,याच मित्रपरिवारानी अच्युतच्या उपचारासाठी कुंभारगाव विभागातून आर्थिक मदत उभी केली. गेल्या 5 दिवसापूर्वी कराड येथील श्री साई हॉस्पिटल मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील अंतरंग हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी अच्युतची प्राणज्योत मावळली. त्याच्या निधनाने कुंभारगाव परिसरात शोककळा पसरली होती. रात्री उशिरा कुंभारगाव येथील वैकुंठधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, 3 चुलते असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि 29/8/2021, रोजी कुंभारगाव ता पाटण येथे होणार आहे.