मुंबईतील श्री हनुमान पतपेढीच्यावतीने पाटण तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना मदत.


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील सहकार क्षेत्रातील नावाजलेली श्री हनुमान नागरी सहकारी पतपेढी आणि जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरगिरी (आंबेगाव),कामरगाव (मिरगाव) आणि बाजे या गावांतील या भूस्खलन बाधित व आपत्तीग्रस्तांना संसारोपयोगी भांडी देऊन मदतीचा हात दिला.

ही मदत संस्थेचे अध्यक्ष शंकर पवार,उपाध्यक्ष रमेश मोरे,संचालक लक्ष्मण पवार,विलास कदम ,रावजी पवार, संदीप पवार,रवींद्र सपकाळ, भरत चव्हाण व्यवस्थापक रामचंद्र पवार, शाखाधिकारी विष्णू पवार तसेच समर्थ बेस्ट कामगार संघटना मागाठाणे आगाराचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष संबंधित गावांत जाऊन जाऊन भूस्खलन व आपत्तीग्रस्त कुटुंबाला देण्यात आली.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज