मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने महाड, पोलादपूर, चिपळूण तसेच कोल्हापूर सातारा, सांगली येथिल पूरग्रस्त भागातील एकुण १० हजार कुटुबांना जीवनावश्यक गृहउपयोगी वस्तू आणि पदार्थ सात ट्रक भरून प्रत्यक्ष त्यात्या भागांत जाऊन दोन दिवसांत वितरित करण्याचे मोलाचे काम केले आहे.
या मदतीच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचे कर्तव्य लालबाग राजा मंडळाने केले आहे . देशावर किंवा मुंबई, महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आली आहे, तेव्हा तेव्हा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी कर्तव्यतत्पर भावनेने प्रत्येकवेळी धावलेले आहे. यंदाच्या आपाद्ग्रस्त परिस्थितीत मंडळाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील कुरंदवाड- चिलखी- मोळी आळी -दत्त मंदीर- शिकलगार वसाहत -बहिरेवाडी- गोठणपूर -बागडीगल्ली- कुरूंदवाड फायरब्रिगेड व सफाई कर्मचारी बांधव- शिरोळ -कवठेगुलंद- अलास- बुबनाळ- औरवाड -गणेशवाडी- गौरवाड -शेडशाळ आणि नृसिंह वाडी तसेच महाड व चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते- खेर्डी- मुरादपूर- सती चिंचघरी -दळवटणे- कोळकेवाडी -पिंपळीखुर्द- कुटेरे- येगाव -कोसबी- तळवडे- जाडे आळी- पोसरे -पागमळा- बालोपे -तसेच जुई- चोचिंदे -सव -कोसबी- सावरतळा- वामणी -गोटे बुद्रुक -शिरगाव- वेताळवाडी- तळेकरवाडी- पोलादपूर- तसेच पाटण तालुक्यातील आंबेघर -शिद्रुकवाडी- सातेवाडी- नाटोशी -किल्ले मोरगिरी -कोळेवाडी- जातेघर या सर्व गावात आपाद्ग्रस्त नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.