महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारा

येत्या सात दिवसात पुरबाधित कुटुंबांना मदत न झाल्यास मनसे स्टाईल उत्तर देवू : महेंद्र जाधव


पूरग्रस्त भागाची मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : अतिवृष्टी होऊन आठ दिवस उलटून सुद्धा प्रशासनाकडून व राज्य सरकार कडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही.पूर बाधित सर्व कुटुंबे ही मंगल कार्यालयात व जिल्हा परिषद शाळेत निवारा घेत आहेत. आपली गुरेढोरे ही मूळ गावी

अडकली आहेत. सदर ठिकाणी आज पर्यंत कोणतेही प्रशासकीय अधिकारी आले नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पूर बाधित गावांना लवकरात लवकर पुनर्वसन करावे लागणार आहे. यासाठी सरकारने जागा देऊन घरे बांधून सर्व सोई द्याव्यात अशी मागणी आहे. परंतु सरकार कडून कोणत्याही प्रकारची सुविधा अथवा पुनर्वसन बाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याने

पूरग्रस्त मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना भेटून न्याय मागणार आहेत. येत्या सात दिवसात जर प्रशासनाने आणि राज्य सरकारने योग्य ती दाखल घेवुन न्याय दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्या अर्धवट वाहून गेलेल्या पुलावरून वाहत्या पाण्यात उड्या टाकून स्वत: च्या जीवाची पर्वा न करता आंदोलन करणार असल्याचा इशारा पाटण तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे यांनी दिला आहे. यात काहीही वाईट घडले तर याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल

 यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, विलास घोणे , चिटणीस चंद्रशेखर मढवी , पाटण तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे, ढेबेवाडी विभाग अध्यक्ष दिपक मुळगावकर, दिपक रेटरे, प्रकाश करपे, जगन्नाथ आबुळकर, सत्यवान गायकवाड, विनायक जाधव, शुभम पाटील, संकेत निवडुंगे,सुरेश सावंत सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.