चांगल्या कामगिरीबद्दल ढेबेवाडी विभागातील दोन पोलिस पाटलांचा स्वातंत्र्यदिनी गौरव.

 


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ढेबेवाडी येथील पोलीस ठाण्यात 15 ऑगस्टचे औचित्य साधत ढेबेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वाझोली गावचे पोलीस पाटील विजय सुतार व मत्रेवाडी गावचे पोलीस पाटील भगवान मत्रे या दोन पोलीस पाटील यांचा चांगल्या कामगिरी बद्दल सत्कार करण्यात आला.

             दि.22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे जिंती येथील जितकर वाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये 23 कुटुंबातील 93 लोकांना तुटलेल्या पुलाला शिड्या लावत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पोलीस पाटील विजय सुतार व भगवान मत्रे यांनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली मौलिक कामगिरी बजावली होती .

               नैसर्गिक आपत्ती काळात योग्य कामगिरी बजावल्या बद्दल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष पवार यांनी त्यांचा स्वातंत्र्यदिनी ढेबेवाडी पोलीस स्टेशन येथील ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी सत्कार केला. या वेळी सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.