कुंभारगाव येथील जाणता राजा युवाशक्ती सेवाभावी संस्थाची सामाजिक बांधिलकी.


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव येथील जाणता राजा युवाशक्ती सेवाभावी संस्थेने ढेबेवाडी आणि काळगाव विभागातील पूरग्रस्त, भूस्खलन, दरडग्रस्त नागरिकांना धान्य, किराणा माल, कपडे, औषधे, लहान मुलांना खाऊ, तसेच शालेपयोगी साहित्याचे मदतीच्या स्वरूपात वाटप केले. 
यामध्ये धनावडेवाडी, शिंदेवाडी भातडेवाडी. धनगरवाडी.गुरव आवाड. जितकरवाडी, सातर, जोशीवाडी, काळगाव येथील लोकांना ही मदत करण्यात आली. 
येथील स्थानिक लोकांच्या व्यथा या संस्थेने जाणून घेतल्या. त्यापैकी जोशीवाडी या गावची अवस्था फार बिकट आहे.
जवळपास एक किलोमीटरपर्यंत जमिनीवर भेगा पडलेल्या असून . काही ठिकाणी जमिनीचं भूस्खलन जवळपास सहा ते सात फूट उंचीचे आढळून आले. काही रस्ते वाहून गेले आहेत.
येथील नागरिकांनी पंचनामे न करता, आमचे सरळ पुनर्वसन करण्याची मागणी राज्यशासनाकडे केल्याचे सांगितले. 
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कुंभारगाव पंचक्रोशीतील सर्व वाड्यावस्त्या, गावं, त्याअंतर्गत मंडळे, व्यक्तींनी भरघोस मदत उपलब्ध करून दिली.
या सेवाभावी कार्यासाठी माजी उपसभापती रमेश मोरे, सुनिल चाळके, विक्रम वरेकर, अमृत चाळके, महेश वरेकर, संदिप वरेकर, सुरेश टोळे, प्रमोद मोरे, दादासो यादव, सागर मोरे, वैभव नलगे, प्रकाश यादव, निवास मोरे, उत्तम माटेकर, रविंद्र माटेकर, दादासो मोरे, सुदाम चव्हाण, विकास भरत मोरे, राजु चव्हाण, आत्माराम मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज