राज्यातील अनेक ठिकाणच्या पुरग्रस्तांना आ. प्रकाश फातर्पेकरांची अशीही मदत


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, चिपळूण, खेड आणि रायगड जिल्ह्यातील महाड तसेच कोल्हापूर, सांगली व जिल्ह्यात अनेकांनी प्राण गमावले.तर दरडी कोसळून हजारो बेघर झाले आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली "मदत नव्हे कर्तव्य" या तत्वावर चेंबूरचे कार्यसम्राट आमदार प्रकाश फातर्पेकर व युवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, शिवसेना चेंबूर विधानसभा संघटक, माजी नगरसेविका कु.सुप्रदा फातर्पेकर यांच्यातर्फे शिवसेना सेवारथच्या माध्यमातून या पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची भरघोस मदत पाठविण्यात आली 

कोल्हापूर, सांगली, कराड याठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे २ मोठे ट्रक भरून शिवसेना सचिव सुरज चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकांना वाटण्यासाठी मार्गस्थ करण्यात आले. तसेच चिपळूण, खेड, महाड, माथेरान या ठिकाणच्या पुरग्रस्तांनाही जीवनावश्यक वस्तूंचे २ मोठे ट्रक भरून पाठविण्यात आले.यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी,स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज