वाझोली गावातील पूल झालाय धोकादायक नूतनीकरणाची ग्रामस्थांची आग्रहाची मागणी.

 


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील वाझोली गावातून जाणाऱ्या रस्त्यावरील 20 वर्षा पूर्वी उभारलेला पूल सध्या धोकादायक बनला आहे. पुलावर केलेला सिमेंट रस्ता पूर्णपणे उखडला असून, त्यातील सळी देखील वर आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.    

 गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सतत जोरदार अतिवृष्टी मुळे पुलावरून पाणी गेले असून पुलाचा काही भाग हा खचला असून लोकांना या पासून धोका निर्माण झाला आहे.

  तरी याच पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेत गावातील पुलाची उंची वाढवावी व पुलाचे नूतनीकरण करावे तसेच गावातील अन्य कामांचे ही निवेदन या वेळी दिले.

          या पुलावरील काही भागात लोखंडी सळी या बांधकामातून बाहेर आले असून या मुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे,तसेच पुलाला आजू बाजूला सरंक्षण कठडे नसल्याने वाहन चालकांनच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

       खा.श्रीनिवास पाटील यांना निवेदन देताना गावातील ग्रामपंचायत सदस्य रमेश लोहार, संदिप पाटील व संजय सकपाळ उपस्थित होते.