प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात वृक्षारोपण


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक  शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या वृक्षसंवर्धन प्रेरणेतून काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे मॅडम ( सचिव,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ) यांचा वाढदिवस महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

काकासाहेब चव्हाण महाविद्यालय परिसरात  काही वर्षांपूर्वी सुरू केलेला उपक्रमामुळे  वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन मोठ्या संख्येने झाले आहे.महाविद्यालय परिसर हिरवाईने नटला आहे.मोठं मोठे डेरेदार वृक्ष,हजारो पक्षी त्यांचा किलबिलाट, कडक उन्हाळ्यात देखील गार सावली असल्याने उन्हाळा जाणवत नाही. परिसरात मनमोहक व प्रसन्न वातावरण असून दरवर्षी शेकडो नवीन वृक्षरोपण व संवर्धन होत आहे.आज मा.प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे मॅडम ( सचिव,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ) यांच्या वाढदिवसानिमित्त मा.एस.के.कुंभार सर - माजी सहसचिव (अर्थ ) व विद्यमान व्यवस्थापन मंडळ सदस्य (श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ) यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.अरूण गाडे, श्री ए.बी.माने सर  (मुख्याध्यापक श्री वा वि तळमावले ) ,श्री प्रदिप माने (संपादक साप्ताहिक कुमजाई ) आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सचिन पुजारी यांनी केले.