गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांना ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ चे सर्टीफिकेट प्रदान


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 54 भावमुद्रा डाॅ.संदीप डाकवे यांना रेखाटल्या होत्या. त्याची दखल अखिल भारतीय विक्रमांची नोंद घेणाऱ्या ‘इंडिया बुक आफ रेकाॅर्ड’ ने घेतली होती. त्याचे सर्टीफिकेट, मेडल, आयकार्ड, पुस्तक डाॅ.डाकवे यांना प्राप्त झाले होते. सदर सर्टीफिकेटची फ्रेम डाॅ.डाकवे यांनी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांना प्रदान केली. याप्रसंगी शिवाजी सुर्वे, छायाचित्रकार अनिल देसाई, दिलीप बोत्रे, सोनाजी घारगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी ना.देसाई यांना ठिपक्यातून पोट्रेट, नावातील अक्षरगणेशा या कलात्मक भेटी दिल्या आहेत. शिवाय ना. शंभूराज देसाई यांच्या वाढदिनी सुंदर रांगोळी देखील रेखाटली होती. तसेच डाॅ.डाकवे यांनी भरवलेल्या शासनाच्या विविध योजनांच्या कात्रणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटने ना.देसाई यांनी केली आहेत. हस्तलिखिते, जलयुक्त शिवार अभियान यावरील पुस्तकांची देखील ना.देसाई यांनी प्रकाशने केले आहेत. गृहाराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी संदीप डाकवे यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज