धरणीमाता फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी. स्तुत्य उपक्रम.

 


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
जिल्ह्यात गेले काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. या अतिवृष्टी मुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली त्यात पाटण तालुक्याला मोठा फटका बसला. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दुर्घटनेत पाटण तालुक्याच मोठं नुकसान झालं. मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाली. अनेक संसार उद्धव्स्त झाले. याच पार्श्वभूमीवर राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून पूरग्रस्तांना मदत सेवा करण्यासाठी अनेक सामजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत.

नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासणारे धरणीमाता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश वाघ यांनी यानी दरडग्रस्त व अतिवृष्टीमुळे बाधीत कुटुंबांसाठी मदतीचा हात दिला व विभागातील लोकांना मदतीचे आवाहन केले. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला विविध गावातली सामाजिक संस्था, उद्योजक व ग्रामस्थ यांच्याकडून मदतीचा ओघ सुरु झाला. धरणीमाताच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या व मदत कार्यास सुरुवात केली.

लोकांकडून आलेली मदत धरणीमाताच्या तर्फे जितकरवाडी, भातडेवाडी, धनावडेवाडी,शिंदेवाडी, तामीने, आंबेघर, हुंबरने, नवजा, डिचोली या गावांना वाटण्यात आली. येथील लोकांना अन्न - धान्य, किराणा माल, कपडे, औषधे, लहान मुलांना खाऊ, तसेच शालेपयोगी साहित्याचे मदतीच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. अतिवृष्टीमुळे ज्यांचे संपूर्ण घरदार पुरामध्ये वाहून गेले आहे अश्या गरजुंना संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.