श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्म ] घोगाव येथे वेलनेस फॅारएव्हर कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन.

 उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी [ डी. फार्म ] या महाविध्यालयात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. महाविध्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडीक यांच्या प्रयत्नातून यावर्षीही वेलनेस फॅारएव्हर या देशभरात सर्वदूर पसरलेल्या नामांकीत केमिस्ट स्टोअर्स यांच्या सोबत महाविध्यालयात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी एकूण 53 विध्यार्थ्यांनी मुलाखतीत सहभाग घेतला होता. त्यातील चोवीस विध्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तर वेलनेस फॅारएव्हर ट्रेनिंग हेड तेजश्री गायकवाड, तसेच त्यांच्या सोबत विविध भागामध्ये काम करणारे HR  व एरिया मॅनेंजर प्रियांका पाटील, निकिता जैन बल्लू सिंग हे उपस्थित होते. 

यावेळी मुलाखतीसाठी आलेल्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन वेलनेस फॅारएव्हर ट्रेनिंग हेड तेजश्री गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन TPO  मोनिका चवरे यांनी केले. तर स्वागत प्राचार्या वैशाली महाडीक यांनी केले.  

या निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ.उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या वैशाली महाडीक यांनी केले.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज