कुंभारगाव येथील निवास सावंत यांचे दुःखद निधन. एक दिलदार व्यक्तिमत्व हरपले.

 

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कुंभारगाव (कळंत्रेवाडी) ता.पाटण येथील निवास (शेठ) मारुती सावंत ( माजी सदस्य,कुंभारगाव ग्रामपंचायत) यांचे सोमवार दि.२३ आँगस्ट २०२१ रोजी वयाच्या 51 व्या वर्षी अल्पशा आजाराने मुंबई यथे दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटूंबावर, मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. ते धार्मिक, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दिलदार व्यक्तिमत्व होते. एक कट्टर शिवसैनिक होते. त्यांचें कुस्ती वर विशेष प्रेम होते. कुंभारगाव परिसरात कुस्तीला प्रोत्साहन देण्याचे व नवीन मल्ल घडवण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे होते. ते विकास नागरी पतसंस्था मुंबई, हनुमान युवक गणेश मंडळ कळंत्रेवाडी यांचे ते अध्यक्ष होते. त्यांना राजकीय, सामाजिक, धार्मिक, विषयाचे सखोल ज्ञान होते. त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वातून असंख्य मित्र परिवार जोडले होते. असे अष्टपैलू व्यक्तीमत्व निवास शेठ यांची ही एक्झिट कुटूंबाला, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या मनाला चटका देणारी ठरली.  

विकास नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक विकास सावंत यांचे ते बंधू होत. त्याचे पश्चात पत्नी, दोन मुले,भाऊ , आई असा परिवार आहे. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम बुधवार दि, 25/8/2021 रोजी कुंभारगाव ता.पाटण येथे सकाळी 9 : 00 वाजता होणार आहे.