चेंबूरमध्ये काँग्रेसचे असेही रक्षाबंधन ; डॉक्टर ,पोलीस ,स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : रक्षाबंधनाचे अनन्यसाधारण महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये आहे.या पार्श्वभूमीवर चेंबुर काँग्रेच्यावतीने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर व माजी नगरसेविका सीमाताई माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधना निमित्त कोरोनाच्या महामारीमध्ये कोरोना परिस्थिती हाताळणारे खरे कोरोना योध्दे म्हणजे डाॕक्टर ,पोलीस ,मनपा कर्मचारी तसेच स्मशानभुमीतील कर्मचारी यांना राखी बांधून साजरा करण्यात आला. 



त्याचप्रमाणे यावेळी देवनार पाडा गोवंडी स्मशानभुमीतील चिमणी आॕपरेटर जैस्वाल यांना मागील आठ महीन्यापासुन पगार मिळाला नाही. त्यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने गृहउपयोगी वस्तु भेट देण्यात आल्या . याप्रसंगी जैस्वाल यांनी भावनीक होऊन सर्वाचे आभार मानले. राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम झाला तर काँग्रेस पक्षाच्या रेखा सावंत , अलका माने , रंजना रासकर ,गीता देसाई , बाळुबाई घरत ,महीला पदाधिकारी तसेच नितेश शिरसाट , मोहन डोंगरे , विक्रम म्हात्रे ,विजय कांबळे , सुनील कंठे ,विश्वनाथ आवळे , जगदिश कांबळे , दिनेश भोईर , स्टीफन नाडर ,मोहम्मद शेख , जीतु घोणे ,संदिप भिलारे ,अशोक ठाकरे ,आदित्य काळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज