कराड येथील शिवाजी स्टेडीयममध्ये उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून पाहणी

बॅडमिंटन कोर्टचे काम पाहून व्यक्त केले समाधान.कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कराड येथील शिवाजी स्टेडीयममध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून 14 लाख खर्चून नव्याने उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

 यावेळी कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, जिल्हा क्रिडाधिकारी युवराज नाईक, नगरसेवक सौरभ पाटील, जयंत पाटील आदी उपस्थित होते.  जिल्हा वार्षिक योजनेतून या बॅडमिंटन कोर्टसाठी 14 लाख रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे 3 बॅढमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. यापूर्वी कराड येथील बॅडमिंटन खेळाडूना बाहेर खेळताना अडचणी येत होत्या. आता नव्याने उभारण्यात आलेल्या कोर्टमुळे त्यांना बाहेर सहजपणे खेळता येणार आहे. या बॅडमिंटन कोर्टमध्ये सर्व प्रकारच्या सूविधा देण्यात आलेल्या आहेत. नुकतेच शासनाने निर्बंधामध्ये शिथीलता दिली आहे. त्याचबरोबर अंडरडोअर खेळाला परवानगी दिली आहे. याचा बॅडमिंटन खेळाडूना लाभ होणार आहे. यावेळी खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज