सावली प्रतिष्ठानचा ऑनलाइन निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न


कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सावली प्रतिष्ठान चिखलेवाडी आयोजित ऑनलाइन निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कुंभारगाव शाळा नंबर 3 येथे मान्यवरांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झाला.

सावली प्रतिष्ठान अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. या प्रतिष्ठानकडून आज पर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत.या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या वर्गातील एकूण 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमास स्पंदन चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप डाकवे, श्री. रमेश मोरे उपसभापती पंचायत समिती पाटण, श्री. दिलीप मोरे सरपंच ग्रामपंचायत चिखलेवाडी, श्री. सुदाम चव्हाण उपसरपंच ग्रामपंचायत चिखलेवाडी, सावली प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रा. सुरेश यादव, प्रा. सुरेश चिखले, श्री. अरुण मोरे फौजी, श्री. विक्रम वरेकर फौजी, श्री रविंद्र माटेकर, श्री मंगेश माटेकर, श्री किशोर मोरे सदस्य ग्रामपंचायत चिखलेवाडी, श्री, जितेंद्र माटेकर सदस्य ग्रामपंचायत चिखलेवाडी, श्री. सागर अनंत मोरे, श्री. मनोहर सावळाराम यादव तसेच सर्व विजेते स्पर्धक, स्पर्धेतील सर्व विद्यार्थी, चिखलेवाडी ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामस्थ हजर होते.

प्रमुख पाहुणे डॉ. संदीप डाकवे म्हणाले, सावली प्रतिष्ठानने आजपर्यंत खूप सामाजिक कार्यक्रम राबवले आहेत. कोरोना काळात त्यांचे योगदान खूपच गौरवास्पद आहे.येथून पुढे त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवावेत आणि भविष्यात कोणतीही त्यांना मदत लागली तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. श्री डाकवे यांनी यावेळी सावली प्रतिष्ठानला एक सुंदर फ्रेम भेट दिली.

श्री. रमेश मोरे आपल्या भाषणात म्हणाले,या प्रतिष्ठानकडून अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबवले जात आहे ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. भविष्यात चिखलेवाडी येथे या प्रतिष्ठानने एक स्पर्धा परीक्षा केंद्र उभारावे आणि जी मदत लागेल ती ग्रामपंचायतकडून पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले.

यावेळी श्री. प्रमोद मोरे, श्री.विक्रम वरेकर यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा.सुरेश यादव यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,श्री. एकनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. कारंडे सर यांनी आभार मानले. यावेळी चि.गौरंग रुपेश माटेकर या चिमुकल्याने देशभक्तीपर गीत गायले. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला.