चेंबूरमधील प्रभाग क्रमांक १५५ मध्ये "मनसे आश्रयालय" उद्घाटन सोहळा


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चेंबूरमधील शाखा क्रमांक १५५ मध्ये स्वातंत्र्य दिन झेंडावंदन आणि ऊन ,वारा, पावसापासून स्वरक्षण होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सुराणा रुग्णालय "मनसे आश्रयालय' उदघाटन सोहळा चेंबूर मनसे विभाग अध्यक्ष विजय गर्जे यांच्या आदेशानुसार तसेच शाखा अध्यक्ष राजेंद्र(राजू) सुरवसे यांच्या पुढाकाराने कोरोना नियमांचे पालन करत पार पडला.

यावेळी मनसेचे महाराष्ट्र जनहित कक्ष विधी विभागाचे सरचिटणीस सचिन काळे ,शाखा अध्यक्ष शारदा वासनिक ,महाराष्ट्र सैनिक कुर्बान अली खान , उपशाखा अध्यक्ष समीर लाड, विनायक आहिरे, विजय सरनोबत, सुनिल काळे, उपशाखा अध्यक्षा शुभांगी कांबळे,शारदा वासनिक,गट अध्यक्ष ओंकार कांबळे, नितीन कांबळे, महाराष्ट्र सैनिक सैनिक कुर्बान अली खान ,आमेष सुरवसे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.