कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे कडून सन 2020 - 2021 रब्बी हंगामात जिल्हास्तरीय पीक स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धे मध्ये कुंभारगावचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांनी हेकटरी 56 क्विंटल 75 किलो एवढे उच्चांकी उत्पादन घेऊन सर्वसाधारण जिल्हास्तर गटात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या वेळी आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे आदी उपस्थित होते.