जनसहकार निधी लिमिटेड ची सामाजिक बांधिलकी.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
जिल्ह्यात गेले काही दिवस पडलेल्या पावसाने धुमाकूळ घातला होता या अतिवृष्टी मुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली त्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दुर्घटनेत जिल्ह्यात मोठं नुकसान झालं. मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाली. अनेक संसार उद्धव्स्त झाले. पूरग्रस्त भागाचे राजकीय नेत्यांकडून पाहणी दौरेही सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून पूरग्रस्तांना मदत सेवा करण्यासाठी अनेक सामजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. 

या अतिवृष्टी मुळे जिल्हयातील सर्वच नद्यांना महापूर आले. वांग नदीकाठी असणारे कराड तालुक्यातील पोतले या गावात देखील महापूराचे पाणी आले. त्यामूळे अनेक घरात पाणी शिरल्याने तेथील लोकांचे नुकसान झाले असून त्यांचे संसार उघड्यावर पडले होते. घरातील जीवनावश्यक वस्तू खराब झाल्या होत्या.
"मदत नव्हे कर्तव्य" या संकल्पनेतून पूरग्रस्त लोकांना नेहमीच सामान्य जनतेच्या गरजूंच्या पाठीशी उभे राहणारे, सामाजिक बांधिलकी जोपासणारे जनसहकार निधी लिमिटेडचे चेअरमन मारूतीराव मोळावडे यांनी मदतीचा हात दिला आहे. 

जनसहकार तर्फे पोतले येथील पुरग्रस्तांना संसारोपयोगी अत्यावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.त्याच बरोबर पाटण तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील धनगरवाडा व करपेवाडी या गावातील गरजू व निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले .

यावेळी चेअरमन मारुतीराव मोळावडे, संचालक आनंदा माने, सल्लागार विलास गोडांबे, रामचंद्र चव्हाण, विलास पवार, मोरेवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भास्करराव मोळावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोकराव पाटील- पोतलेकर, रोटरी शिक्षण संस्था मलकापूरचे सचिव विलास पाटील, अंकुशराव नांगरे, पोतलेचे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच अविनाश गुरव, पोलीस पाटील फरजाना मुल्ला, रामचंद्र पाटील, वैशाली अनिल माळी, सदाशिव पवार, अशोक पाटील, प्रमिला पाटील, आश्लेषा शिंदे, विजया सुतार, राजू जाधव यांच्यासह 'जनसहकार' चे सदस्य उपस्थित होते.