म्होप्रे येथील "दिल दोस्ती दुनिया दारी" या ग्रुपची सामाजिक बांधिलकी.


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ढेबेवाडी विभागातील वांग खोऱ्यात मुसळधार पावसाने दरडी कोसळत असल्याने जितकरवाडी , धनावडेवाडी, शिंदेवाडी या गावातील लोकांचे स्थलांतर जिंती हायस्कूल येथे करण्यात आले आहे या लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे येथिल आपत्तीग्रस्तांना म्होप्रे ता कराड येथील वाॅट्सॲप ग्रुप ने तब्बल २० हजार रुपयांचे संसार उपयोगी साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपत मदतिचा हात पुढे केला आहे. 


गत आठवड्यात ढेबेवाडी भागात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी रस्ते, पूल, शेतीचे नुकसान झाले आहे. मराठवाडी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये दक्षिणेस डोंगरांच्या कुशीत जितकरवाडी, शिंदेवाडी, धनावडे वाडी वसले आहे.येथे दरडी कोसळत असल्यामुळे या गावांना धोका निर्माण झाला होता त्यामुळे प्रशासनाने तातडीने या गावातील नागरिकांना जिंती येथील हायस्कूल तर काहींना ढेबेवाडी येथील मंगल कार्यालयात स्थलांतर केले आहे या लोकांना मदतीचा हात म्हणून म्होप्रे या गावातील "दिल दोस्ती दुनिया दारी" या ग्रुप च्या सदस्य डॉक्टर सतीश पाटील, सचिन चव्हाण विक्रम जुंबरे, विजय साळुंखे आबासाहेब पाटील, महेंद्र शेडगे, प्रदिप क्षिरसागर, विक्रम पाटील, विजय कुंभार, प्रमोद क्षिरसागर, राजू शेडगे, यशवंत साळुंखे, राजाभाऊ लींबारे, दादा पाटील, अरविंद कदम, अजित पाटील, सुनील माने मित्र मंडळ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत एकत्र येऊन तब्बल २० हजार रुपये किमतिचे संसार उपयोगी साहित्य देत मदतीचा हात पुढे केला आहे त्यांचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.