डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून सतीश तवटे यांना 9000 वी कलाकृती प्रदान


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील कुंभारगांव येथील सुप्रसिध्द ज्योतिश विशारद सतीश तवटे (काका) यांना डाॅ.संदीप डाकवे यांनी 9000 वी कलाकृती भेट दिली आहे. श्री. तवटे हे आपल्या ज्ञानातून अनेकांना मार्गदर्शन करत असतात. त्यांचा सन्मान व्हावा यासाठी डाॅ.डाकवे यांनी त्यांचे रेखाटलेले सुंदर रेखाचित्र दिले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू संतोष तवटे, शिवानी तवटे, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराश्ट्र राज्य च्या सचिव सौ.रेश्मा डाकवे व तवटे कुंटूंबीय उपस्थित होते. दरम्यान तवटे परिवाराकडून डाॅ.संदीप डाकवे यांचा शाल, श्रीफळ देवून  सत्कार करण्यात आला.

यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी 100 वी कलाकृती पद्मश्री नीलकंठ खाडीलकर, 500 वी पदमश्री डाॅ.प्रकाश आमटे, 1000 वी अभिनेते भरत जाधव, 2000 वी अभिनेते सुबोध भावे, 3000 वी अभिनेत्री अश्विनी महांगडे, 4000 वी सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम, 5000 वी एसपी तेजस्वी सातपुते, 6000 वी पत्रकार हरीष पाटणे, 7000 वी एसपी अयजकुमार बन्सल, 8000 वी आरटीओ तेजस्विनी चोरगे तर 9000 वी कलाकृती सतीश तवटे यांना नुकतीच दिली आहे.

चित्रकलेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा, ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये एकदा झाली आहे. त्यांचा महाराष्ट्र शासन दरबारी 4 वेळा सन्मान झाला आहे. शिवाय विविध संस्थांनी सुमारे 50 हून अधिक पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच स्पंदन ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. केवळ चित्रे न रेखाटता त्यातून आर्थिक मदत देण्याचाही प्रयत्न केला आहे. डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत 20 पेक्षा जास्त कलात्मक उपक्रम राबवून समाजमनावर आपली कर्तृत्वमुद्रा उमटवली आहे.