बोंद्री येथे सापडला 9 फुटी आजगर ; सर्पमित्रांने पकडून दिले वनविभागाच्या ताब्यात .
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
पाटण जवळील बोंद्री येथील बुरंबेश्वर मंदीरापाठीमागे गुरूवारी संध्याकाळी 9 फुट लांबीचा आजगर सापडला असून सर्पमित्रांकडून पकडून त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे या परिसरात गुरे चारणारे गुराखी, ग्रामस्थांनी सूटकेचा निश्वास टाकला. 

बोंद्री गावपोच रस्त्यावर ओढ्यालगत बुरंबेश्वर मंदिर आहे, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास या मंदीरापाठीमागे काही स्थानिक गुराख्यांना मोठ्या गवतामध्ये हे आजगर दृष्टीस पडले , भला मोठा अजगर पाहून उपस्थितांची भंबेरी उडाली, लोकांनी याची माहिती सर्पमित्र अक्षय हिरवे यांना दिल्यानंतर हिरवे यांनी उमेश कुंभार,विनय कुंभार,लखन मोरे या आपल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन तात्काळ त्या ठिकाणी जाऊन अथक प्रयत्नाने हिरवे यांनी आपल्या सहकार्‍यांच्या सहकार्याने आजगरास पोत्यात जेरबंद करून वनविभागाच्या ताब्यात दिले,

        यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. हा अजगर साधारण 9 फुट लांब असुन सुमारे 25 किलो वजनाचा आहे .
मात्र या घटनेनंतर या परिसरात गुरे चारणा-या गुराखी व ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
___________________________________
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बोंद्री गावालगतच्या डोंगरात मोठे भुस्खलन होऊन मोठमोठे वृक्ष, दगड माती मिश्रीत मलमा ओढ्यातून खाली वाहून आला आहे यातून हा अजगर ओढ्याच्या प्रवाहातून खाली वाहून आला असण्याची शक्यता आहे. भुस्खलनाने झालेल्या प्रवाहातून मोठमोठे साप, आजगरे ओढ्यातून वाहत गावाच्या दिशेने आले असल्याने नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. 
संजय कांबळे - ग्रामस्थ बोंद्री
___________________________________