समर्थ-सुहासच्या नेत्र शिबिराचा ४५० जणांना लाभ : पिसाळ

मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन करताना दिपकसिंह पाटणकर, डॉ. सौ. शुभांगी घाडगे, नितीन पिसाळ, दादा खांडके व अन्य.  

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : बुधराणी हॉस्पिटल पुणे व समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्ट पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण येथे घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात शहर व परिसरातील सुमारे साडेचारशे सर्वसामान्य नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी १६० जणांना चष्मे वाटप करण्यात आले तर ६० नागरिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरल्याची माहिती शिबिराचे आयोजक नितीन पिसाळ यांनी दिली.

येथील सी-गोल्ड रेस्टो येथे पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल व समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन जेष्ठ नागरिक दिपकसिंह पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र आरपीआयचे सरचिटणीस रविंद्र सोनावले, विश्वहिंदू परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, समर्थ सुहास चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. शुभांगी घाडगे, दादासाहेब खांडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना बुधराणी हॉस्पिटल, पुणे येथे नेऊन त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी बुधराणी हॉस्पिटलचे डॉ. शोराब मुलाणी, डॉ. सागर लेंबे, डॉ. नितीन पाटील, सत्यजित शेडगे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज