माणिक देसाई यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन.
कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री.माणिक उर्फ भाऊसाहेब रघुनाथ देसाई रा.कुंभारगाव ता.पाटण यांचे वयाच्या 52 व्या वर्षी अल्पशा आजारानेे आज सकाळी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्यात, आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
त्यांचा धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात सहभाग असायचा. ते वारकरी संप्रदायात हिरहिरीने सहभाग घेत असत. कुंभारगावातून पंढरपूरला पायी दिंडीत स्वतःचा ट्रॅक्टर वारकऱ्यांच्या सेवेसाठी घेऊन वारीला जात असे. एक प्रगतशील शेतकरी, दिलखुलास व्यक्तिमत्व अशी   त्यांची ओळख होती. कुंभारगाव परिसरात ते सर्वांचे परिचित होते. सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात पुढे करून प्रत्येकाच्या सुख दुःखात हिरहिरीने सहभाग घेत असत. नुकतीच काही महिन्यापूर्वी कुंभारगाव ता पाटण शिवसेना शाखा उपप्रमुख पदी त्यांची नियुक्ती झाली होती. 
Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज