चार महिन्यांनंतर कराड ते रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळे नजीकचा पुल वाहतुकीस खुला.

 


उंडाळे : कराड - रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळे नजीकचा पुल वाहतूकीसाठी खूला. 
( छायाचित्र : जगन्नाथ माळी )

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
उंडाळे ता. कराड ते रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळे नजीक दक्षिण मांड नदी वर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून काल चार महिन्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास हा पुल वाहतूकीसाठी खूला करण्यात आला. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. कराड चांदोली या रस्त्याचे युनिटी हायब्रीड योजनेतून नूतनीकरण रुंदीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता पाचवड फाटा ते शेडगेवाडी पर्यंत अंतिम टप्प्यात आला आहे. कराड तालुक्याच्या हद्दीपर्यंत तो पूर्ण रस्ता झाला असून हा रस्ता करताना रस्त्यावरील पुलाची कामे ही करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक फरशी पूलाचा समावेश आहे. 

कराड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा व कोकणाला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून पाचवड फाटा, उंडाळे, शेडगेवाडी फाटा यामार्गे कोकणात जाण्यासाठी सोयीचा ठरणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून चालू आहे. यामध्येच ओंड, उंडाळे या दोन गावांच्या मध्ये असणाऱ्या दक्षिण मांड नदीवरील पुलाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून चालू होते. गेल्या चार महिन्यापासून हे काम दिवसरात्र या सत्रामध्ये चालू ठेवून ठेकेदाराने कमी कालावधीमध्ये पुलाचे काम पूर्ण केले. आज बुधवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. हायब्रीड अँन्यूटी प्रोजेक्ट अंतर्गत या रस्त्याचे रुंदीकरण करणे त्याचबरोबर सुशोभीकरण करण्याचे काम चालू आहे दक्षिण मांड नदीवरील पुलाचे काम अत्यंत सुलभ व मजबूत झाले आहे. पूर्णपणे कॉंक्रीट व स्टील वापरून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. दक्षिण मांड नदीवरील पुलाच्या कामासाठी 50 कामगार दिवसरात्र काम करत होते. जुन्या पुलापेक्षा नवीन पुलाची रुंदी वाढवण्यात आली असून नवीन पुलाची रुंदी 13 मीटर व लांबी 33 मीटर करण्यात आली आहे. व पुलाची उंची नऊ मीटर करण्यात आली आहे. त्या मुळे पुला वरती एक वेळेला तीन वाहाने आरामात पास होतील अश्या पद्धतीने त्यांचे डिझायन बनवण्यात आले आहे . काल सायंकाळी चारच्या सुमारास या पूलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पूलापासून 240 मीटर रस्ता डांबरीकरण करण्याचे शिल्लक आहे. तसेच संरक्षक बॅरीयल बसवण्याचे काम शिल्लक आहे. येत्या पंधरा दिवसांत हे उर्वरित काम होणार आहे. पूलावरून वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहनधारकातून व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

            पाचवड फाटा ते कोकरूड या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी साधारणता 109 कोटी रुपये चा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याच्या अंतर्गत डांबरीकरण, रुंदीकरण ,मोहरी बांधणी व दोन पुलांची कामे यात करण्यात आली आहेत. त्याच बरोबर गरजे नुसार प्रत्येक गावात पॅक बंद कॉक्रीट गटर ही बांधण्यात आली आहेत. पूल पाडण्यात आला. फेब्रुवारीत नव्या पूलाच्या कामाच्या सुरुवात केली त्यानंतर वादळी पाऊस नदीला आलेले पाणी यामुळे काही दिवस काम ठप्प झाले. तरी या अडचणीतून मार्ग काढीत ठेकेदाराने काम गतीने हाती घेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सध्या पुलाच्या वरील स्लॅप पूर्ण झाला असून दोन्ही बाजूचा भराव आणि अपूर्ण रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने  वळविण्यात आली होती. ज्या मार्गाने ही वाहतूक वळविण्यात आली होती. तो मार्ग सुस्थितीत नव्हता त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे वाहनधारक, प्रवासी यामधून समाधान व्यक्त होत आहे.