युवाभारती संघटनेची स्थापना: अनिलकुमार कदम.

 


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
महाराष्ट्रातील युवकांना शिक्षण, रोजगार,व्यवसाय, उद्योग मार्गदर्शन व संघटन यासाठी युवाभारती संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचे युवाभारतीचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी सांगितले.

अनिलकुमार कदम पुढे म्हणाले की,
"देशातील व महाराष्ट्रातील युवकांना भारतीय प्रजासत्ताक संविधानाच्या लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष सर्वधर्मसमभाव, विज्ञाननिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता या पंचसूत्री कार्यक्रम बाबतीत प्रबोधन,संघटन, संशोधन, प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.स्वातंत्र,समता व बंधुता या तत्त्वांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी नियोजन व कार्यवाही करण्यात येईल."

सातारा जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन युवाभारती संघटनेत सहभागी व्हावे.असे आवाहन युवाभारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केले आहे.

लवकरच सातारा जिल्हा युवाभारती संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.तरी सातारा जिल्ह्यातील भारतीय प्रजासत्ताक संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्यासाठी इच्छुक युवकांनी 8275214889 या व्हाटस् अप क्रमांक वर संपर्क साधावा.असे आवाहन युवाभारती संघटनेचे वतीने करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवाभारतीच्या शाखा स्थापन करण्यात येणार आहेत.या युवाभारती संघटनेचे माध्यमातून विधायक रचनात्मक कार्यासाठी एकत्रितपणे विचार करून कामकाज सुरू करण्यात येईल.युवकांच्या शैक्षणिक, सामाजिक, रोजगार, नोकरी मार्गदर्शन, व्यवसाय उद्योग मार्गदर्शन यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.तरी सातारा जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन युवाभारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांचेशी भ्रमणध्वनी क्रमांक 8275214889 या व्हाटस् अप नंबर वरती संपर्क साधावा.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगांव येथील वि.का. स.सेवा सोसायटीत यशवंतराव चव्हाण शेतकरी सोसायटी बचाव पॅनेलचा दणदणीत विजय. 13-- 0 ने मोठा विजय प्राप्त.तर शिवशंभू ग्रामविकास पॅनेलचा दारुण पराभव.
इमेज