यापुढे तारीख नाही थेट अटॅक करणार, नरेंद्र पाटलांचा सरकारला इशारा

 


सोलापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा : आता मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट अ‍ॅटॅक करू, असा इशारा देतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यांना नक्षलवादी होऊ देऊ नका , असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक नरेंद्र पाटील यांनी सरकारला केलं. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात आज सोलापुरात प्रचंड मोठ्या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला हजारो मराठा तरूण सहभागी झाले होते. यावेळी मोर्चकऱ्यांना संबोधित करताना पाटील यांनी हे आवाहन केलं. या पुढे प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी आता तारीख देणार नाही. थेट अ‍ॅटॅक करू, असा इसारा दिला. हे सरकार भविष्यात तुम्हाला अडचणीत आणू शकतं. त्यामुळे काळजी घ्या, असं सांगतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन नरेंद्र पाटील यांनी केलं.