मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : बेस्टचे माजी अध्यक्ष आणि चेंबूरचे कार्यसम्राट नगरसेवक अनिल पाटणकर यांनी कोरोना काळात आपल्या विभागातील नागरिकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय मराठा महासंघ (चेंबूर) यांच्यावतीने कोव्हिड योद्धा समाजरक्षक सन्मान २०२१ पुरस्कार पाटणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.
या सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यास अखिल भारतीय मराठा महासंघाच्या चेंबूर शाखेचे अध्यक्ष सचिन शिंदे , सरचिटणीस मोहन पवार, खजिनदार सुधीर पाटील , उपाध्यक्ष संजय पाटील , महिला अध्यक्ष अनिताताई महाडीक, महिला सरचिटणीस मिनाक्षीताई देशमुख ,महिला उपाध्यक्षा दिपाली पाटील तसेच विजय पाटील, अनिल शिंदे,विकास भोसले, सुभाष पाटील, दिलीप पाटील, शिवराम पालव, यमुनाताई मुळीक, शितल आंबर्ले,सुनंदा घाडगे, हौसा अरगडे, कुंदा भोईटे, उषा कदम, नलिनी भिलारे, सविता शिंगाडे,अलका आदी कार्यकर्ते उपस्थित होते.