कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात १.४९ टीएमसीने वाढ ; प्रतिसेकंद आवक २० हजार २३१ क्यूसेक्स


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्यासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात बुधवारी १.४९ टीएमसीने वाढ होऊन पाणीसाठा ४५.०८ टीएमसी झाला आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद २० हजार २३१ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. गत चोवीस तासात धरणातील पाणी उंचीत १.९७ इंचाची वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण ४५.०८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४ दिवसांपासून दमदार पाऊस सुरू झाला आहे. धरणात सध्या सरासरी प्रतिसेकंद २० हजार २३१ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणात एकूण पाणीसाठा ४५.०८ टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ३९.९६ टीएमसीआहे. पाणीउंची २१०१.०७ फुट, जलपातळी ६४०.५६ मीटर इतकी झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ ते बुधवारी संध्याकाळी ५ या चोवीस तासातील व एक जूनपासून आजपर्यंत झालेला एकूण पाऊस कंसात पुढीलप्रमाणे कोयना ५७ मिलिमीटर (११५९), नवजा ८१ मिलिमीटर, (१४८६), महाबळेश्वर ७९ मिलिमीटर (१५८७) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.