संरक्षक भिंत अंगावर कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

 

मंगेश मोहिते व कोसळलेली संरक्षक भिंत.

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शहरातील गटाराचे काम करत असताना बंगल्याची संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. मंगेश भीमराव मोहिते (वय १८, रा. इंदिरानगर, पाटण) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद पाटण पोलिसात झाली आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील प्रभाग क्र. १७ मध्ये नव्याने गटार बांधण्याचे काम सुरू आहे. शनिवारी इंदिरानगर येथील भीमराव मोहिते हे आपला मुलगा मंगेश याला सोबत घेऊन सकाळपासून गटाराचे खोदकाम करत होते. जेवण झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास मंगेश खोदकाम करत होता. अचानक शेजारील बंगल्याची चार फूट उंचीची भिंत मंगेश यांच्या छातीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेची फिर्याद मंगेशचे वडील भीमराव मोहिते यांनी पाटण पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निंगराज चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार के. आर. खांडे करत आहेत.

Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज