उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उंडाळे येथे रक्तदान शिबिर संपन्न.

उंडाळे : आशा सेविका यांना किटचे वाटप करताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, समवेत तहसीलदार अमरदीप वाकडे, अँड. आनंदराव पाटील, सरपंच सौ.संगीता माळी, आदी.

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
राज्यात कोरोना महामारी मुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यापाश्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य अँड . आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुक्यातील उंडाळे येथे कराड येथील यशवंत ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या रक्तदान शिबीरात 60 हून अधिक जणांनी रक्तदान केले. 

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अँड आनंदराव पाटील, सरपंच सौ संगीता माळी, संस्थेचे संचालक व्ही. के. शेवाळे, माजी सरपंच दादासाहेब पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे व्यवस्थापक जयसिंगराव शिंदे, उपव्यवस्थापक बाळासाहेब शेवाळे, प्राचार्य बी. आर पाटील यांची उपस्थित होती. 

सातारा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तहसीलदार अमरदीप वाकडे, यांनी शिबीरास भेट दिली. याप्रसंगी त्याच्या हस्ते आशा सेविका, अंगणवाडी सेविका, यांना सेफ्टी किट चे वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले, रक्ताची टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर उंडाळे सारख्या ग्रामीण भागात अँड. आनंदराव पाटील यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिबिरामुळे आरोग्य विभागाला चांगले सहकार्य होणार आहे. अतिशय अडचणीच्या प्रसंगी हा चांगला उपक्रम राबवला आहे. सध्याच्या परिस्थितीत हा उपक्रम अनुकरणीय आहे.    

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रयत जिमखाना, व गरुड झेप अँकेडमी, संस्थेतील सेवक, युवक, यांनी परिश्रम घेतले. अँड आनंदराव पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्य बी. आर. पाटील यांनी आभार मानले.