चेंबूरच्या ४० वर्षे पूरातन हनुमान मंदिराचा नगरसेवक पाटणकरांनी केला जीर्णोद्धार


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील जुने संभाजीनगर येथे असलेल्या ४० वर्षें पुरातन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार बेस्टचे माजी अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर यांनी आपल्या नगरसेवक फंडातून केला आहे.या नूतन मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन थाटात पार पडला.

हा जीर्णोद्धार सोहळा शिवसेनेचे विभाग प्रमुख मंगेश सातमकर , चेंबूर विधानसभेचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी विधानसभा संघटक अविनाश राणे,उपविभाग प्रमुख अशोक माहुलकर , महिला उपविभाग संघटिका सुलभा पत्याने, अणुशक्तीनगर विधानसभा संघटक निमिष भोसले, शाखाप्रमुख उमेश करकेरा, शेखर चव्हाण, संजय राठोड, चेंबूर परिसरातील समाजसेविका मीनाक्षी पाटणकर ,कार्यालय प्रमुख मारुती वाघमारे , युवासेना शाखा अधिकारी विनय शेट्ये आणि युवासेना महिला-पुरुष पदाधिकारी, व स्थानिक नागरिक उपस्थित होते. नगरसेवक पाटणकर यांनी कोरोना काळातही आपल्या विभागात विविध सामाजिक विकास कामाचा धुमधडाका चालविला आहे. अनेक वास्तूंचे नूतनीकरण, लादीकरण ,रस्ते बांधणी, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती आणि कोरोनामूळे बेरोजगार झालेल्यांना आणि गरजूंना मोलाची मदत करण्याचे काम केले आहे.