विलासकाकांच्या जयंती निमित्त साहित्य वाटप.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : लोकनेते स्व. विलासराव पाटील-उंडाळकर (काका) यांची ८३ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मांजरी बुद्रुक, पुणे येथे विलासकाकांच्या ८३ व्या जयंती निमित्त पद्यश्री डॉ. सिंधुताई सपकाळ अनाथ आश्रमात अन्नदान, वृक्षारोपण, शालेय साहित्य, दैनंदिन उपयोगी वस्तू व मास्क,सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्यत संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद थोरात, प्रवीण पाटील, विश्वजीत कांबळे-पाटील, संदीप शेवाळे, दीपक पाटील, अविनाश जाधव, सुबोध कणसे, शुभम जाधव, जयदीप लाड, अविनाश शिंदे, सर्जेराव पाटील, सूरज थोरात, अमर जाधव, सत्यम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विक्रमसिंह नलवडे-पार्लेकर यांनी प्रास्ताविक केले. परिक्षित गरुड यांनी आभार मानले.