मंगळवारी आझाद मैदान येथे लावणी कलावंतांचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : गेले दीड वर्षे लावणी कलावंतासह इतर लोक कलावंतांना या लॉक डाऊनमुळे शो नाही, त्यामुळे आतापर्यंत अनेक कलावंतांनी आत्महत्या केल्या आहेत.काहींना या टेंशनमुळे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.म्हणून आम्हाला आमचा रोजगार मिळावा, आम्ही आमच्या कलेच्या जीवावर स्वतःचा उदरनिर्वाह करू, आम्ही शासनाकडे अनेकवेळा मागणी करूनही सरकार आमचा विचार करत नाही म्हणून पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही धरणे (आक्रोश) आंदोलन करत आहे.

प्रमुख मागणी - 

१)लवकरात लवकर मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू करावेत.

२)प्रत्येक कलाकाराना रोजगार उपलब्ध करावा.

३)सरकारने सर्व कलाकारांना झालेले नुकसान म्हणून काही आर्थिक मदत करावी.किमान प्रति महिना रु.५०००/- सहाय्य करावे.

४)शासनाकडून कलाकारांना ओळखपत्र वितरीत करावे.

५)शासकीय नोकरीत कलाकारांनसाठी कोटा ठेवावा.

६)शासनाकडून कलाकारांचा विमा काढण्यात यावा.

      सदर आंदोलन मंगळवारी दि ६ जुलै २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता आझाद मैदान,मुंबई महानगरपालिका समोर,मुंबई येथे होणार आहे.