एक रेखाचित्र पुरग्रस्तांसाठी; संवेदनशील चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचा उपक्रम


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
राज्याच्या विविध भागात विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्हयात अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरग्रस्तांच्या मदतीमध्ये आपला खारीचा वाटा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘एक रेखाचित्र पुरग्रस्तांसाठी’ असा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांर्तंगत आपण आपल्याला हवे असलेले व्यक्तिचित्र डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून रेखाटून घ्यायचे व त्या बदल्यात त्यांना रु.1,000/- किंवा त्यावर स्वइच्छेने कितीही मुल्य द्यायचे. या उपक्रमांतर्गत जमा होणारी सर्व रक्कम पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे. सदर उपक्रम सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राबवण्यात आला आहे.

डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वीही कलेच्या माध्यमातून पूरग्रस्त, नैसर्गिक, राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी निधी संकलन करुन आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्याला हवा असलेला व्यक्तीचा फोटो sandeepdakve@gmail.com या ईमेलवर अथवा व्हाटसअप वर पाठवल्यानंतर डाॅ.संदीप डाकवे त्याआधारे संबंधिताचे काळया रंगाच्या आऊटलाईन मधील आकर्षक रेखाचित्र करुन ईमेल किंवा व्हाॅटसअप करतील. तसेच मुळ चित्र संबंधिताना कुरियर अथवा पोस्टेज केले जाईल.

या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवून आपले रेखाचित्र चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून काढून घेतल्यास आपली मदत थेट पुरग्रस्तांना मिळेल तसेच आपले रेखाचित्र आणि पुरग्रस्तांना स्वतः योगदान दिल्याचे आत्मिक समाधान मिळेल.

एक संवेदनशील कलावंत म्हणून मी कलेच्या माध्यमातून चित्ररुपी खारीचा वाटा देवू शकतो. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास आहे. आपल्या कलेचा संकटाच्या कालावधीत उपयोग होवू षकतो यासारचे दुसरे समाधान नाही. अषी भावनिक प्रतिक्रिया इंडिया बुक ऑफ होल्डर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे.

सदर चित्राचे मुल्य संदीप राजाराम डाकवे, आयडीबीआय बॅंक, शाखा - कुंभारगांव, खाते क्रमांक - 0625104000046844, आयएफएससी कोड-0000625 या खात्यावर ऑनलाईन जमा करावे किंवा 9764061633 या क्रमांकावरती गुगल पे करावे. तरी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.


चौकटीत:

कलेच्या माध्यमातून आतापर्यंत झालेली मदत:

नाम फाऊंडेशन ला रु.35,000/- ची मदत

केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/- ची मदत

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साठी रु.6,000/- ची मदत

आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज ला रु.5,000/- ची मदत

माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5,000/- ची मदत

कु. ईशीता पाचुपते यांना रु.5,000/- ची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला रु.4,000/- ची मदत ची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी पुरग्रस्तांना रु.3,000/- ची मदत ची मदत

भारत के वीर या खात्यात रु.1,000/- चा निधी जमा