शिष्याची गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा ; सामाजिक बांधिलकी म्हणून आदर्श विद्यालयासाठी सचिन पाचूपते यांची ५० हजारांची मदत.


विंग | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
विंग विद्यालयाचे माजी विद्यार्थी व येथील उपसरपंच सचिन पाचुपते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. ज्या विद्यालयात आपण शिकलो ज्ञानाची शिदोरी या विद्यालयातून आपल्याला मिळाली तेथील गुरुजनांनी दिलेले ज्ञान, संस्काराचे धडे यावर भविष्यात आदर्श नागरिक होता आल ही या विद्यालयाची खूप मोठी देणगी आहे. आपणही आपल्या शाळेला काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून या विद्यालयाला बहुउददेशीय सभागृहासाठी ५० हजारांची भरीव मदत दिली. ही मदत म्हणजे शिष्याने गुरुला दिलेली गुरुदक्षिणा होय . त्यांनी गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा म्हणून दिलेली मदत विद्यालयासाठी लाखमोलाची ठरली आहे. सभागृहाच्या अंतिम टप्प्यातील बांधकामाला त्यामुळे हातभार लागला आहे.

लोकसहभागातून येथील आदर्श विद्यालयात बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.अनेक हातांनी त्यासाठी मदत केली आहे. अर्धा खर्च संस्थेनेही उचलून हातभार लावला आहे. कोरोना काळात कामाची गती निधीअभावी मंदावली असताना गरज ओळखून उपसरपंच श्री. पाचुपते यांनी त्यासाठी तातडीने ५० हजार भरीव मदत देऊन शाळेप्रती ऋण व्यक्‍त केले.
'माझी शाळा, माझे कर्तव्य' उपक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. बी. मोरे यांच्याकडे धनादेशाद्वारे निधी सुपूर्त केला. 
यावेळी विद्यालयाने श्री. पाचुपते यांचा सत्कार केला. तत्पूर्वी लोकमान्य टिळक व डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी झाले. ग्रामपंचायत सदस्य विकास माने, बाबूराव खबाले, यु. एस. गलांडे, पर्यवेक्षक डी. जे. निकम, एस. पी. चव्हाण, एस. एस. यादव, एस. व्ही जाधव, एस. एन. जाधव, व्ही. व्ही. देवकर, एन. आर. पाटील, एस. व्ही. सावंत, एम. एस. लोहार, एस. आर. पाटील, एम. बी. पाटील, वाय. एस. सनदी यांसह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून येरवळेच्या माऊली ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष भास्करराव थोरात यांनी सभागृृहाची फरशी बसवून देण्याचे जाहीर केले आहे.