कुठरे (पवारवाडी) येथे शिवसंपर्क अभियानाला सुरवात

 


कुठरे|कृष्णाकाठ वृत्तसेवा : शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील कुठरे (पवारवाडी) गावात शिवसंपर्क अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.या अभियानाच्या माध्यमांतून संपूर्ण महाराष्ट्रात गाव तेथे शाखा झाली पाहिजे तर घर तेथे शिवसैनिक तयार झाला पाहिजे . असे आदेश शिवसैनिकांना देण्यात आले आहेत.

 शिवसेना ठाणे उप शहरप्रमुख व भारतीय मराठा संघ ;प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अविनाशजी पवार दादा यांचे नेतृत्वात पाटण तालुक्यातील मौजे पवारवाडी कुठरे या ठिकाणी शिवसेना शाखेचा शुभारंभ शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आला .

 यावेळी शिवसेना पाटण तालुका संघटक सुनिल पवार म्हणाले ;संपूर्ण हिंदूस्थानमध्ये एका नामांकित संस्थेने देशातील संपूर्ण राज्यांचा सर्वे केला असता शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचा आदर्श व नंबर एकचे मुख्यमंत्री म्हणून गौरव करण्यात आला आहे . अशा आदर्श सर्वोतम मुख्यमंत्र्यांचे व शिवसेना पक्षाचे आपण शिवसैनिक आहोत याचा आपणाला सार्थ अभिमान असायला पाहिजे . त्यामुळे गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक तयार झालाच पाहिजे . 

  याप्रसंगी पवारवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश लोहार , ग्रामपंचायत सदस्य अंकुश पाटील , शिवस्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष राहुल लोहार , प्रसाद देसाई , जेष्ठ शिवसैनिक शंकर लोहार , ऋषीकेश पवार , दिलीप सुतार , साहिल चौगुले , विशाल पवार , रविराज लोहार , दिपक लोहार , अनिकेत शेजवळ , युवराज कदम, सागर पवार , रोहित कदम , सुरेश साठे , उत्तम पवार , शंभुराज लोहार व इतर शिवसैनिक उपस्थित होते .

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज